कार्तिकी एकादशीनिमित्त नाथ समाधीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मांदियाळी

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : कार्तिकी एकादशीनिमित्त नाथसमाधीचे दर्शन घेण्यासाठी नाथनगरीत भक्तांचा महापूर ओसंडला आहे.
आज कार्तीकी शुध्द भागवत एकादशी आहे. आषाढी कार्तिकी मज यावे भेटायला असे गुंज सांगीतले पांडूरंगा. या अभंगातील उक्ती नुसार ज्या भाविकांना आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जाता आले नाही, त्यांनी कार्तिकी एकादशीला विठ्ठल दर्शन घेण्यासाठी यावे अशी म्हण आहे. यानुसार आज रविवारी कार्तीक एकादशी निमित्त नाथ समाधीचे दर्शन घेण्यासाठी पैठण नगरीत हजारोच्या संख्येने भाविक दाखल झाले.


पहाटे चार वाजेपासुन गोदावरीनदीत पवित्र स्नान करून भाविकानी शिस्तीने रांग लावून नाथ समाधीचे दर्शन
घेतले. संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांनी कर्नाटकातील विजय नगर येथील कृष्ण देवराया कडून कार्तीक शुध्द एकादशीला पुन्हा पांडुरंगाची मुर्ती पंढरपूरला आणून त्याची प्राण प्रतिष्ठा भानुदास महाराज याच्या हस्ते करण्यात आली. या घटनेला आज कार्तीक एकादशीला गुरूवारी ५१९ वर्षे पुर्ण झाली आहेत.

 एकादशी निमित्त नाथ संस्थांच्या वतीने भाविकांना आपले मोबाईल, दागिने, पॉकेट सांभाळावे चोरापासून सावध रहावे असे आवाहन करण्यात येत होते. यावेळी वाहतुकाची कोंडी होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी खंडोबा मंदिर, दिगंबरराव कावसानकर स्टेडियम या सह नाथ मंदिरात मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. पैठण येथील गोदावरी नदीच्या काठावर आज कार्तिकी एकादशीच्या निमिताने मोठ्या प्रमाणात भक्तांनी स्नान करण्यासाठी गर्दी केली होती.